छ. शिवाजी महाराज 🙏

छ. शिवाजी महाराज यांचा मृत्यू ३
एप्रिल १६८० रोजी रायगड किल्ल्यावर झाला. सबंध रयतेला
पोरक करून रयतेचा राजा वयाच्या ५० व्या वर्षी स्वराज्य
सोडून गेला. महाराणी . पुतळाबाई या महाराजांच्या चितेवर सती
गेल्या. महाराणी सोयराबाई आणि मंत्रिमंडळाने संभाजी महाराज
यांना याचा कानोसा लागू न देता राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक
करण्याचा घाट बांधला. राजाराम यांना गादीवर बसवल्यानंतर
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना संभाजी महाराज यांना कैद
करण्यास पन्हाळ्यावर पाठवले. परंतु हंबीरराव मोहिते यांनी संभाजी
राजांना मदत करत रायगड ताब्यात घेतला. स्वराज्याचे युवराज
छत्रपती झाले. 
शिवाजी महाराजांची कारकीर्द पुढे त्यांच्या मोठा सुपुत्र संभाजी
महाराज यांनी मोठ्या चातुर्याने आणि सामर्थ्याने सांभाळली. संभाजी
महाराज हे मरेपर्यंत अजिंक्य राहिले आणि शिवाजी महाराज इतिहास
अजरामर करून गेले.

Comments

Popular Posts